मधुमेह : एक गंभीर समस्या!
मधुमेह म्हणजे काय?
मधुमेह म्हणजे मानवी शरीरातील चयापचय क्रियेमध्ये निर्माण झालेल्या विकृतीमुळे शरीरातील वाढलेले रक्तशर्करेचे प्रमाण.
मधुमेह कशामुळे होतो
मानवी शरीर जेव्हा पुरेशा प्रमाणात इन्शुलिन हे संप्रेरक निर्माण करीत नाही, किंवा निर्माण झालेले इन्शुलिन शरीराच्या पेशींकडून स्वीकारण्याची क्षमता कमी होते तेव्हा मधुमेह होतो.
मधुमेहाची लक्षणे
रक्तशर्करेच्या वाढलेल्या प्रमाणामुळे वारंवार लघवीस होते, वारंवार तहान लागते, अति भूक लागते ही मधुमेहाची ठळक लक्षणे म्हणता येतील.
मधुमेहाचे प्रमुख प्रकार
मधुमेह एकूण तीन प्रकारचा आहे.
१) शरीरातील इन्शुलिनची निर्मिती थांबल्यामुळे आवश्यक असलेले इन्शुलिन इंजेक्शनद्वारे द्यावा लागणारा मधुमेह; म्हणजेच इन्शुलिन डिपेंडन्ट डायबेटीस मेलिटस. किंवा बालवयात होणारा मधुमेह.
२) मानवी शरीरामध्ये तयार होणारे इन्शुलिन शरीरातील पेशींनी न स्वीकारणे व याचबरोबर शरीरातील इन्शुलिन निर्मितीची प्रक्रिया मंदावणे; म्हणजेच नॊन इन्शुलिन डिपेंडन्ट डायबेटीस मेलिटस. किंवा प्रौढ वयात होणारा मधुमेह.
३) गर्भवती स्त्रियांमध्ये रक्तशर्करेचे प्रमाण वाढल्यामुळे होणारा मधुमेह.
मधुमेहाविषयीची तथ्ये
१) जगातील विकसनशील देशांमध्ये मधुमेहाचे प्रमाण एखाद्या साथीच्या रोगाप्रमाणे वाढत आहे. या दशकात या देशांमधील बहुसंख्य लोक मधुमेही होण्याची शक्यता असल्याचा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यू एच ओ) व्यक्त केला आहे.
२) जगातील एकूण मधुमेही रुग्णांपैकी सत्तर टक्के रुग्ण हे आपल्या भारतासारख्या विकसनशील देशांमधील असतील.
३) आजमितीस जगातील सर्वाधिक मधुमेही रुग्ण भारतात असून त्यांची संख्या ५०.८ दशलक्ष इतकी आहे. इ. स. २०३० मध्ये हीच संख्या १९६.० दशलक्ष इतकी प्रचंड होण्याची शक्यता आहे.
मधुमेहावरील उपचारांवर होणारा खर्च
इ.स. २०१० मध्ये जागतिक पातळीवर झालेल्या एका सर्वेक्षणामधून असे दिसून आले आहे की, एका मधुमेही रुग्णास उपचारासाठी प्रतिवर्षी करावा लागणारा खर्च हा सुमारे ८७८ डॊलर्स म्हणजेच सुमारे ४५ हजार रुपये इतका आहे. याचाच अर्थ एका मधुमेही रुग्णास मधुमेह व तदानुषंगिक आजारांवर दरमहा ३७५० रुपये इतका खर्च करावा लागतो. इतका खर्च करणे भारतासारख्या देशातील सामान्य व्यक्तीला परवडणारे नाही.
हर्बोडायबाप्लेक्स
अशा परिस्थितीमध्ये हर्बोडायबाप्लेक्स हे आयुर्वेदाचा मंत्र आणि आधुनिक उपचाराचे तंत्र यांचा सुयोग्य संगम साधणारे औषध हा मधुमेही रुग्णांसाठी एकमात्र आशेचा किरण आहे.
हजारो वर्षांपासून मधुमेहावरील उपचारांसाठी आयुर्वेद अनेक औषधी वनस्पतींचा वापर करीत आहे. नेमकी हीच गोष्ट विचारात घेऊन दीर्घ संशोधनातून हे औषध विकसित करण्यात आले आहे.
शंभर टक्के वनस्पतीजन्य व पारंपारिक आयुर्वेदावर आधारित असे हे औषध असल्यामुळे ते अत्यंत निर्धोक, दुष्परिणामरहीत व तितकेच परिणामकारक आहे. हे औषध मधुमेहामुळे मानवी शरीरावर होत असलेल्या दुष्परिणामांना आळा घालून शरीराची हानी भरून काढण्यास मदत करते. गेल्या दशकापासून सुमारे १० हजार मधुमेही रुग्णांना या औषधाने नवजीवन प्राप्त करून दिले आहे. या मध्ये मधुमेहामुळे हृदय, मूत्रपिंड, डोळे, चेतासंस्था यावर परिणाम झालेल्या रुग्णांचाही समावेश आहे.
हर्बोडायबाप्लेक्स नेमके कसे कार्य करते?
या पूर्वी उल्लेख केलेल्या पहिल्या दोन प्रकारच्या मधुमेहामध्ये हर्बोडायबाप्लेक्स अत्यंत उपयोगी ठरते. स्वादुपिंडातील बिटा पेशींना उत्तेजित करून इन्शुलिन या संप्रेरकाची निर्मिती करण्यास उद्युक्त करणे आणि, निर्माण झालेले इन्शुलिन शरीरातील पेशींना स्वीकारण्यास उद्युक्त करणे या दोन्ही स्तरांवर हर्बोडायबाप्लेक्स तितक्याच परिणामकारकपणे कार्य करते.
केवळ शरीरातील रक्तशर्करेचे प्रमाण कमी करण्याचे कामच हर्बोडायबाप्लेक्स करते असे नव्हे तर आयुर्वेदातील रसायनचिकित्सेप्रमाणे कार्य करून मधुमेहामुळे होणार्या गुंतागुंतीच्या आजारास प्रतिबंध करून रुग्णांचे आयुष्य वाढविण्यासही मदत करते.
मधुमेहविरोधी कार्य करणार्या आधुनिक औषधांचा मानवी हृदयावर होणारा दुष्परिणाम हा विविध देश व या संदर्भात संशोधन करणार्या संस्था यामध्ये नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. आजमितीस मधुमेहावर वापरली जाणारी अनेक आधुनिक औषधे या मुद्द्यावर नेहमीच वादाच्या भोवर्यात सापडलेली दिसतात. त्यामुळे अशा औषधांच्या वापराची जोखीम पत्करण्याऐवजी हजारो वर्षांपासून आयुर्वेद वापरीत असलेल्या वनस्पतीजन्य औषधांकडे मधुमेही रुग्णांनी वळणे केव्हाही श्रेयस्कर ठरते.
आयुर्वेदाचा मंत्र : आधुनिक तंत्र
हजारो वर्षांची परंपरा असलेल्या आणि नैसर्गिक जीवनशैलीला पूरक ठरलेल्या आयुर्वेद उपचार प्रणालीमध्ये अनेक वनस्पती मधुमेह या रोगावरील उपचारासाठी वापरल्या जातात, परंतू आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत या वनस्पती चूर्ण किंवा अन्य स्वरूपात घेणे सहज शक्य होत नाही, त्यामुळेच अथक संशोधनातून आम्ही शोधलेले हर्बोडायबाप्लेक्स हे मधुमेही रुग्णांना नवसंजीवनी देणारे, अत्यंत गुणकारी औषध कॆप्सूलच्या स्वरुपामध्ये आपणासमोर आणले असून, ते अन्य अन्य औषधांचे मधुमेही रुग्णांवर होणारे दुष्परिणाम टाळून इन्शुलिनसारख्या वेदनादायी उपचारांपासून रुग्णांना मुक्तता मिळवून देण्यात यशस्वी ठरले आहे. आपण, आपले आप्त, स्नेही यापैकी कोणीही मधुमेही असल्यास हर्बोडायबाप्लेक्सच्या अधिक माहितीसाठी संपर्क साधा.
suhas124[@]yahoo.com
सुहासजी,
जवाब देंहटाएंमधुमेहावरील हा नवा ब्लॉग वाचला. माहितीतून मधुमेहावरील या औषधाने रोगावर उपाय सापडला आहे. त्याचे सविस्तर वर्णन वाचले.
याचे उत्पादन कुठे व कसे उपलब्ध होईल? काय किंमत? व आत्ता पर्यंत कोणी ते घेऊन काय फरक पडला? यावर प्रकाश टाकावा. ही विनंती.
सुहासजी,
जवाब देंहटाएंमधुमेहावरील हा नवा ब्लॉग वाचला. माहितीतून मधुमेहावरील या औषधाने रोगावर उपाय सापडला आहे. त्याचे सविस्तर वर्णन वाचले.
याचे उत्पादन कुठे व कसे उपलब्ध होईल? काय किंमत? व आत्ता पर्यंत कोणी ते घेऊन काय फरक पडला? यावर प्रकाश टाकावा. ही विनंती.
सुहासजी,
जवाब देंहटाएंमधुमेहावरील हा नवा ब्लॉग वाचला. माहितीतून मधुमेहावरील या औषधाने रोगावर उपाय सापडला आहे. त्याचे सविस्तर वर्णन वाचले.
याचे उत्पादन कुठे व कसे उपलब्ध होईल? काय किंमत? व आत्ता पर्यंत कोणी ते घेऊन काय फरक पडला? यावर प्रकाश टाकावा. ही विनंती.
सुहासजी,
जवाब देंहटाएंमधुमेहावरील हा नवा ब्लॉग वाचला. माहितीतून मधुमेहावरील या औषधाने रोगावर उपाय सापडला आहे. त्याचे सविस्तर वर्णन वाचले.
याचे उत्पादन कुठे व कसे उपलब्ध होईल? काय किंमत? व आत्ता पर्यंत कोणी ते घेऊन काय फरक पडला? यावर प्रकाश टाकावा. ही विनंती.